80 हजार रिक्त पदे (Vacancies) राज्यसेवे तर्फे (MPSC) 2024 मध्ये भरली जाणार ...

तुम्ही तयार आहात का ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) ही महाराष्ट् शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.

MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो.

राज्यसेवा परीक्षा

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.[]

  • MPSC State Services Examination – राज्य सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Forest Services Examination – महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Agricultural Services Examination – महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
  • MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam – दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
  • MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam – सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
  • MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
  • MPSC Police Sub-Inspector Examination – पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
  • MPSC Sales Tax Inspector Examination – विक्रीकर निरीक्षक परीक्षा
  • MPSC Tax Assistant Examination – कर सहायक गट-क परीक्षा
  • MPSC Assistant Examination – सहायक परीक्षा
  • MPSC Clerk Typist Examination – लिपिक-टंकलेखक परीक्षा

पात्रता

वयाची १९ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे.खुल्या(अराखीव) प्रवर्गा साठी कमाल ६ संधी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांसाठी कमाल संधीची मर्यादा नाही तर उर्वरित मागास प्रवर्गा साठी कमाल ९ संधींची मर्यादा आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्लिश भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.

mpsc classes in vasai
mpsc course in virar

MPSC राज्यसेवा पात्रता निकष – महत्त्वाचे मुद्दे

  • MPSC पात्रता निकषांसाठी नमूद केलेली सर्व संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याची खात्री करा.
  • शिधापत्रिका आणि शिकाऊ चालकाचा परवाना ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जात नाही
  • MPSC कर्मचारी/शासकीय सेवकांनी वयोमर्यादा शिथिलतेचा दावा करणाऱ्यांनी MPSC ने विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • सर्व कागदपत्रांवरील स्वाक्षरी एकसारखी असणे आवश्यक आहे.
  • पात्रता निकष, अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे, खोट्या माहितीसाठी दंड, निवड पद्धत, परीक्षा आयोजित करणे, परीक्षा केंद्रांचे वाटप, निवडलेल्यांची निवड आणि पदस्थापना याबाबत MPSC ने घेतलेले निर्णय अंतिम असतील. उमेदवार प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रश्नांची दखल घेतली जाणार नाही.

MPSC राज्यसेवेसाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवार मराठीत कुशल असणे आवश्यक आहे. त्याने/तिने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेली असावी. विशिष्ट पदांसाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: ICWA द्वारे वाणिज्य/सीए/आउटलॉ अकाउंटिंगमधील बॅचलर डिग्री/कॉमर्स/एमबीए (वित्त) मध्ये पदव्युत्तर पदवी
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी.
  • इतर पदांसाठी पदवी

MPSC वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वयाच्या निकषाखाली येणे आवश्यक आहे.

  • मि. वय – १९ वर्षे
  • कमाल वय – 38 वर्षे

वय विश्रांती

श्रेणी

कमाल वयोमर्यादा

सामान्य

38 वर्षे

राखीव/अनाथ

४३ वर्षे

माजी सैनिक

४३ वर्षे

पात्र खेळाडू

४३ वर्षे

अपंग लोक

४५ वर्षे

आजच संपर्क करा आणि सरकारी नोकरीच्या तयारीला लागा..

कोर्स ची वैशिष्ट्ये:
१. संपूर्ण अभ्यासक्रम तज्ञ शिक्षका द्वारे शिकवला जाईल
२. चालू घडामोडी वर विशेष चर्चासत्र
३. जनरल अवरेनेस, करंट अफेयर्स  क्विझ  मोबाईल ॲपद्वारे
४. सी सॅट साठी ऑनलाईन सपोर्ट
५. जनरल अवेयरनेसच्या ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्टस
६. ऑडिओ-व्हिज्युअल ट्रेनिंग
७. इन्स्टिट्यूटमध्ये लायब्ररी सपोर्ट (सकाळी ८ ते संध्याकाळी ९)
८. आणि बरेच काही
mpsc course in vasai

IIKD - सर्वसामान्यांची अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करणारी एकमेव संस्था

    Call Now